Sarathi
सिॲटल् महाराष्ट्र मंडळाचा ‘सारथी’ हा दिवाळी अंक दरवर्षी तुमच्या भेटीला आणण्याचा आमचा प्रयत्न असतो. सारथी प्रकाशित करण्यामागे भरपूर काम असते जसे की सभासदांकडून सर्व लेख गोळा करणे, अंक रचना, अंक सजावट, मुद्रण शोधन (proof reading), छपाई, वितरण व्यवस्था वगैरे.
सारथीद्वारे आम्ही आपल्या सभासदांना (अगदी आजी-आजोबांपासून ते आपल्या बालगोपाळ सदस्यांपर्यंत) त्यांचे विचार व्यक्त करायला, त्यांच्यातील लेखकाला, कलाकाराला आपले लेखन / कला दर्शवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. शिवाय आपल्या community मधील लघु उद्योजकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातीची संधी उपलब्ध करून देतो. (त्याची मंडळाला सुद्धा सारथी प्रकाशित करण्याच्या खर्चात मदत होते.)
रथाचा सारथी जसा प्रवासात मार्गदर्शन करतो, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे उद्दिष्ट आपल्या मंडळाच्या वाढीचा आणि प्रगतीच्या प्रवासात आपल्या सदस्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना जोडणे आहे. त्यामुळेच हे नाव दिवाळी अंकासाठी सार्थ आहे असे आम्हाला वाटते.