मराठी शाळेचा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र शासन – बालभारती, यांच्या सहकार्याने भारताबाहेर वास्तव्यास असलेल्या मुलांसाठी तयार केलेला आहे. बालवाडी ते पाचवी,अशा सहा इयत्तांमध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे.
कुठलीही भाषा ही दृक, श्राव्य आणि लिखित स्वरूपात शिकली जाते. म्हणूनच आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात मराठी लेखनाबरोबर, मराठी बोलणे आणि मराठी ऐकणे ह्यावर विशेष भर दिलेला आहे.