Maitri Melava – Khadya Mahotsav
मैत्री मेळाव्याच्या निमिताने सिऍटल महाराष्ट्र मंडळ प्रथमच महाराष्ट्रीय पदार्थांचा खाद्यमहोत्सव भरवत आहे.
खाद्यमहोत्सवासाठी महाराष्ट्रातील पाच वेगवेगळ्या भागातील चविष्ट, रुचकर, तोंडाला पाणी सुटेल असे आपले खास महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ दुपारच्या जेवणासाठी उपलब्ध असतील. हे पाच विभाग आहेत – कोंकण, खान्देश-मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि मुंबई चौपाटी.
MENU
ह्या मैत्री मेळाव्यामध्ये किचन कलाकारांना अर्थात सिऍटल मधील सुगरणी आणि बल्लवाचाऱ्यांना आपली पाककला दाखवण्याची आणि लोकांची खवैय्येगिरीची हौस पुरवण्याची धमाल संधी!! आणि त्यांना गरज आहे आपल्या प्रोत्साहनाची.
मग कसली वाट बघताय! खाद्यमहोत्सवात सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर मैत्री मेळाव्याचे तिकीट घ्या. आणि या मेळाव्यात
“तुमच्या आमच्या जिभेचे चोचले पुरवू या
मराठी खाद्यसृष्टीची बहार आणू या!”
* आधी पोटोबा
रगडा-पॅटीस -$10, कोथिंबीर वडी $5 for 3, मॅंगो लस्सी -$5
Combo above 3 items : $15
* नागपुरी चाट
दाल-कचोरी मटर रस्सा – $8, कचोरी – $4, मिरची भजी – $6 for 2
मिरची भजी चाट – $10
* कल्प क्रिएशन
ऊपजा -$7, सांबार वडी, दही – $7 खरवस – $5
* मिसळ कट्टा
मिसळ-पाव – $10, ओल्या नारळाची करंजी – $5 for 2, मसाला ताक – $3
Combo of above 3 items- $15
* मराठमोळी
पुरणपोळी, कटाची आमटी -$12 for 2
* सिंहगड स्पेशल
पिठलं – ज्वारीची भाकरी – $8, कोकण स्पेशल उकडीचे मोदक $10 for 3
* ग्लोबल मकान
कोकम सरबत, पन्ह, -$2.50, मुगाच्या डाळीचा हलवा – $4, अननस-शीरा -$4
* पंगत
वांग्याचं भरीत, भाकरी, ठेचा
पाणी-पुरी – $5 for 5, फळांचं कस्टर्ड – $5, वडा-पाव – $10 for 2
* पुरी, बटाटा भाजी, श्रीखंड
* बालगोपाळांसाठी पास्ता
Note: स्नॅक्स आणि जेवण विकत मिळेल. सकाळचा नाश्ता SMM कडून!!