Ruchkar Upwas Competition
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर “रुचकर उपवास” या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे!
आपण नेहमी म्हणतो ना “एकादशी आणि दुप्पट खाशी”, ते अगदी खरे आहे! आपल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये खूप विविधता आहे आणि या पदार्थांची चव नेहमीच आपल्या स्मरणात असते. SMM या निमित्ताने तुम्हाला तुमचा आवडता उपवासाचा पदार्थ बनवण्याची कृती सर्वांबरोबर share करायची संधी देत आहे! तुम्ही आम्हाला तुमच्या उपवासाच्या पदार्थाच्या पाककृतीचा व्हिडिओ पाठवावा. आपल्या प्रवेशिका ऑगस्ट 18 पर्यंत स्वीकारल्या जातील. या पाककृतींचे परीक्षण आपल्याच SMM सभासदांमधील तज्ज्ञ परीक्षकांमार्फत केले जाईल. तसेच हे व्हिडिओ सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या social platforms वर प्रसारित केले जातील (Facebook).
व्हिडिओ entries@seattlemm.org येथे पाठवावा.
पाककृतींचे नाव, व्हिडिओ मध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे संपूर्ण नाव, वय, शहराचे नाव हा सर्व तपशील नमूद करावा. आम्ही आपला व्हिडिओ सिॲटल् महाराष्ट्र मंडळाच्या social platforms वर प्रसारित करू (Facebook). व्हिडिओ पाठवताना कृपया Google Drive Link पाठवावी.
तर मग व्हा तयार, करा उपवास, खा सुग्रास! 😋
वेगळी, नाविन्यपूर्ण किंवा पारंपारिक पण वेगळ्या पद्धतीने केलेली उपवासाला चालणारी पाककृती लवकरात लवकर पाठवा.