मराठी भाषा दिवस – हस्ताक्षर स्पर्धेसाठी गूगल प्रवेशिका

पूर्वी शाळेत असताना आपण सर्वच हस्तलेखन करायचो. सध्याच्या संगणक आणि मोबाईल फोनच्या युगात हस्तलेखन तसे मागे पडत चालले आहे. त्यातही मराठीतून हाताने लिहिणे तर अजूनच दूर . ‘सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना’ असे म्हणतात. सुंदर हस्तलेखन ही एक कला आहे. ती कालबाहय होऊ नये आणि त्या निमित्ताने मराठी भाषेचाही प्रसार व्हावा ही दोन उद्दिष्ट्ये ठेवून
मराठी भाषा गौरव दिनाच्या आणि २३ जानेवारीला झालेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने SMM जाहीर करत आहे – “मराठीमध्ये लिहू काही”  सुंदर हस्ताक्षर स्पर्धा. ही स्पर्धा तीन वयोगटांसाठी असेल –किशोर गट (वय १२ आणि खाली)
युवा गट (वय १३ आणि १८ च्या मध्ये)
प्रौढ गट (वय १८ आणि अधिक)
➡️ सर्वाना समान संधी मिळावी याकरता स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटासाठी वेगळा पण एकच समान लेखन उतारा SMM कडून देण्यात येईल.
➡️  स्वतः:च्या हाताने लिहिलेल्या सुंदर, वळणदार आणि व्याकरणाच्या चुका नसलेल्या लेखनास मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात (२४ फेब्रुवारी रोजी) प्रेक्षकांच्या उपस्थितीत पारितोषिक दिले जाईल.
➡️ स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. सर्व स्पर्धकांच्या लेखनास SMM कडून प्रसिद्धी देण्यात येईल. परंतु विजेत्या स्पर्धकांचे सभासदत्व असणे गरजेचे आहे,
➡️ स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील नियम वाचावेत आणि दिलेली गुगल प्रवेशिका भरून द्यावी. हस्ताक्षर लेखनाच्या कागदाचे प्रकाशचित्र (photograph) काढून आम्हाला ————@ ह्या पत्त्यावर पाठवावे. ई-मेल करताना त्यात आपले नाव, वय, वयोगट आणि शहर नमूद करावे.
➡️ स्पर्धेची प्रवेशिका आणि हस्ताक्षर लेखनाचे प्रकाशचित्र (photo) पाठविण्याची अंतिम तारीख: १९ फेब्रुवारी, २०२४

Date/Time
Sat Feb 24, 2024
3:30 PM to 7:30 PM

Address
Shirdi SaiBaba Temple, Redmond
18109 NE 76th ST Unit 108
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply