Sutradhar & Interview with Prashant Damle

 

 

 

 

 

 

 

रत्नाकर मतकरींच्या अनेक अजरामर नाटकांपैकी एक “चार दिवस प्रेमाचे.” प्रेमात असलेली, पडलेली, बुडालेली किंवा तरलेली वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळी युगुलं आणि त्यांचे अनुभव या नाटकात वर्णिले आहेत. आपण या नाटकात कधी सूत्रधाराबरोबर ती वर्णिलेली दृश्य बघत असतो, तर कधी काही दृश्य आपल्या एवढी जवळची असतात, कि चक्क त्या पात्राच्या रूपात आपण शिरतो. कधी सूत्रधार पात्र होतो, तर कधी पात्र सूत्रधार. रत्नाकर मतकरी या महान “सूत्रधाराला” आदरांजली वाहण्यासाठी यापेक्षा उत्तम नाटक ते कोणते? म्हणून “सूत्रधार या काय्रक्रमात सिॲटल् च्या च Xprements टीम चे कलाकार, याच नाटकातली काही दृश्ये आपल्यासमोर सादर करणार आहेत. मतकरींना श्रद्धांजली वाहण्यासाठी, नाटकाच्या शेवटी विशेष उपस्थिती म्हणून येणार आहेत, “प्रशांत दामले!!!”

आज संध्याकाळी ७:०० वाजता!!!

हे नाटक झाल्यावर, मतकरींच्या “चार दिवस प्रेमाचे”, “जादू ‘तेरी नजर” अशा नाटकांमध्ये ज्यांनी काम केलेले आहे, ते आपले सगळ्यांचे आवडते अभिनेते “प्रशांत दामले” यांच्याशी आपण मारणार आहोत, दिलखुलास गप्पा. तुमचे प्रश्न, कार्यक्रमाच्या वेळी कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोचवा.

आज संध्याकाळी ८:३० वाजता!!!

तेव्हा चुकवू नका, नक्की पहा, कार्यक्रम “सूत्रधार”

Date/Time
Sat Jun 13, 2020
7:00 PM to 9:30 PM

Address
Seattle Maharashtra Mandal
7345 164th AVE NE SUITE 145 PMB#113
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply